
जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे आज धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी यागाने झाली. या प्रसंगी डॉ. उमाकांत चौधरी यांनी सहपत्निक सहभागी होऊन धार्मिक विधी पार पाडले. त्यानंतर डॉ मयुरी चौधरी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले व त्यांनी भक्तिभावाने धन्वंतरी स्तोत्राचे पठण केले. त्यानंतर डॉ मुकेश चौधरी यांनी संहिता वाचन करून सर्वांना आयुर्वेदाच्या शाश्वत ज्ञानाची आठवण करून दिली.
या कार्यक्रमात कॉलेज व हॉस्पिटलमधील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच नॉन-टीचिंग स्टाफ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे वातावरण धार्मिक आणि प्रेरणादायी झाले होते.




