सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून डॉक्टरदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी )- डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भारतात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर दिवस निमित्त सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वर्षीचा विषय ‘बिहाइंड द मास्क: हू हील्स द हीलर्स’ हा डॉक्टरांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर केंद्रित होता. डॉक्टरांच्या योगदानाचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी पाठिंबा दर्शविणे हाच या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमात डॉक्टर्सना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या अनुभवांवर व आव्हानांवर चर्चा झाली. सेंट्रल बँकेच्या सर्व ४३ शाखांमार्फत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी बँकेच्या विविध आरोग्यसंबंधित योजनांची माहिती देखील देण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून बँकेचे प्रादेशिक प्रमुख रमेश जेठानी व मुख्य व्यवस्थापक अभिषेक नंदेश्वर यांनी जळगाव जिल्हा रुग्णालय व आरोग्य केंद्रांना भेट दिली. तेथे डॉक्टर्स व त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया समाजप्रती असलेली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी अशा उपक्रमांद्वारे सादर करत असते.