आर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशासकीय

६२ गहाळ मोबाईल पोलिस अधीक्षकांनी केले मूळ मालकांकडे सुपूर्द!

जिल्ह्यात विविध ठिकाणी हरवलेल्या मोबाईलचा सायबर पोलिसांनी घेतला शोध

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठांमधून हरवलेल्या मोबाईलचा जळगावच्या सायबर पोलिसांनी शोध घेऊन तब्बल १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ६२ अँड्रॉईड मोबाईल हस्तगत केले. या सर्व मोबाईल त्यांच्या मालकांकडे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतिष गोराडे आणि पोलिस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांना विशेष आदेश देण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलिस स्टेशन, जळगाव येथील पोहेकॉ किरण वानखेडे, हेमंत महाडीक, पोना सचिन सोनवणे, पोकॉ पंकज वराडे, गौरव पाटील, मिलींद जाधव आणि दिपक पाटील या अधिकाऱ्यांनी कार्यरत पथक तयार केले.

मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जाऊन गहाळ मोबाईलचा शोध घेतला. तांत्रिक तपास, सीआयडी नेटवर्क आणि आयएमईआय क्रमांकाच्या आधारे शोध घेण्यात आला. या सर्व मोबाईलचा परतावा कार्यक्रम शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडला. हस्तगत मोबाईलचे आयएमईआय क्रमांकासह संपूर्ण तपशील जळगाव पोलिसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. नागरिकांना स्वतःचा हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टल (Central Equipment Identity Register) वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button