अभिवादनआरोग्यजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

देशाचे २०४७ पर्यंत विकसनशिल, आत्मनिर्भरतेकडे पाऊल : डॉ.उल्हास पाटील

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : आजचा दिवस आपल्यासाठी केवळ उत्सव नाही तर नया भारत या ध्येयाच्या दिशेने एक मजबूत व प्रेरक पाऊलही आहे. आपला उद्देश २०४७ ला भारताला आत्मनिर्भर विकसित आणि सशक्त राष्ट्र म्हणून उभे करणे असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, गोदावरी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या नीलीमा चौधरी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते.

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत तसेच देशभक्तीपर भाषणे सादर केली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी नया भारत संकल्पनेविषयी माहिती दिली. डॉ. उल्हास पाटील यांनी गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्‍या सर्व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगताना गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे आता रौप्य महोत्सवी वर्षात शैक्षणिक क्षेत्रातील गौरवशाली वाटचाल करीत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील विधी कॉलेज, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल व इतर संस्थांचे प्राध्यापक वर्ग व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button