MIDC मधील केमिकल कंपनीला लागलेली आग अखेर आटोक्यात!

आमदार, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून भेट!
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरातील आर्यवत प्रा. लि. केमिकल कंपनीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसून अखेर मोठ्या परिश्रमांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने कंपनीतील कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून कुठलीही जीवित हानी झाली नाही. याठिकाणी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची भेट देत पाहणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील आर्यवत प्रा. लि. केमिकल कंपनीला आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली असून, आग इतकी भीषण आहे की आगीचे लोड हे दोन ते तीन किलोमीटर वरून नागरिकांना दिसत आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नेमकी आग कशी लागली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
जीवितहानी नाही
लागल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यासह घटनास्थळी त्वरीत भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले. दरम्यान, कंपनीतील कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. महानगरपालिका व MIDC अग्निशमन/अभियांत्रिकी विभागाकडून अग्निशमन गाड्यांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सलग, वेगवान व समन्वयित प्रयत्न करण्यात आले. अखेर मोठ्या परिश्रमांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे कौतुक
औद्योगिक परिसरातील आगीसारख्या घटनांमध्ये त्वरित प्रतिसाद, कार्यक्षम समन्वय आणि सजगता अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व यंत्रणांनी अशा परिस्थितीत तत्परता दाखवून जीवित आणि संपत्तीची हानी टाळावी, असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. तसेच अग्निशमन दल, MIDC, महानगरपालिका, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दाखविलेल्या तत्पर समन्वयाचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.




