वाहनाचे कुलूप तोडून ४ लाखांच्या सिगारेटचे पाकीट केले लंपास

शहरातील मध्यवर्ती भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील वर्दळीच्या गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ पार्कींगला लावलेल्या वाहनाचे कुलूप तोडून त्यातुन ४ लाख रूपये किंमतीचे सिगारेटचे पाकीट चोरून नेल्याची २८ जून रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर जवरीलाल राका (५०) रा. नवीपेठ, जळगाव यांची गोविंदा रिक्षा स्टॉप येथे पानटपरी आहे. २७ जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानासमोर पार्कींगला लावलेले वाहन क्रमांक ( एमएच १८ सीवाय ०१२३) चे वाहनाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले ४ लाख रूपये किंमतीचे सिगारेटचे पाकीट चोरून नेले. हा प्रकार शनिवारी २८ जून रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आला. याबाबत चंद्रशेखर राका यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.