
जळगाव (प्रतिनिधी) : श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित शिव कॉलनी आशा बाबा परिसर सावित्रीबाई महिला मंडळाच्या वतीने २७ जुलै रोजी रात्री संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज गुरुवर्य मुरारी नामदास महाराज यांचा हरी किर्तन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गणपती मंदिरात झालेल्या या सोहळ्यामध्ये मुरारी महाराज यांनी संत नामदेव महाराज जनाबाई यांच्या जीवनावर कीर्तनाचे काही प्रसंग सांगितले.
राष्ट्रीय संत नामदेव महाराज यांनी सर्व समाजाला जोडण्याचे महान कार्य. श्री शिक्षणाचे पहिले प्रणेते संत नामदेव महाराज हे होते. जनाबाईंना त्यांनी अभंग ओव्या व शिक्षणाचे महत्व पटवून दिले होते. तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना व संतांना एकत्र करण्याची कार्य त्यांनी केले होते. त्यामुळेच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे संत म्हणून सुद्धा म्हणतात. पंढरपूर ते घुमान भागवत धर्माचा पताका नेऊन त्यांनी धर्माचे सुद्धा मोठे महान कार्य करून मोगल काळात हिंदू धर्मासाठी मोठे कार्य केल्याचे सुद्धा मुरारी महाराज यांनी कीर्तन सोहळ्याप्रसंगी सांगितले.
कीर्तन सोहळ्याला प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील आणि माजी महापौर सीमाताई भोळे यांनी मुरारी महाराज यांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतला. सोहळ्याला समाजातील व परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल करणार, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, शाखाध्यक्ष सुधाकर कापुरे, संभाजी शिंपी, योगेश शिंपी, विनोद खैरनार, केतन मेटकर, चार्ली शिंपी, अशोक सोनवणे, सुरेश सोनवणे, प्रमोद शिंपी, देवानंद शिंपी, किरण भांडारकर, राम जगताप आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.