
१८ ऑगस्ट रोजी होणार लोकार्पण
जळगाव (प्रतिनिधी)- हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुखमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील वसंतराव नाईक चौकाच्या सुशोभीकरणास बुधवारी त्यांच्या जयंतीदिनी सुरुवात करण्यात आली. जळगांव महानगर पालिकेच्या वतीने परवानगी मिळाल्याने या चौकात स्तंभ उभारून त्यावर वसंतराव नाईक यांची आरेखीत प्रतिमा लावण्यात येणार आहे.
या स्तंभाचे उद्घाटन माजी महापौर सीमा भोळे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माझी महापौर विष्णू भंगाळे व नगरसेवक अतुल बारी व राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रीय सरचिटणीस वाल्मीक पवार, बंजारा कर्मचारी संघटनेचे बी.बी.धाडी सर ,बंजारा युवा प्रीमियर लीग चे मुख्य आयोजक नितीन जाधव, युवा समाजसुधारक चेतन चव्हाण, पूनम पवार, उपाध्यक्ष विशाल पवार, मनोहर चव्हाण, कृष्णा पवार, युवराज राठोड, सुरज राठोड, योगेश राठोड, अशोक राठोड, अनिल राठोड, गोरसेनेचे अध्यक्ष अर्जुन जाधव, यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. तसेच यावेळी वसंतराव नाईक यांच्या कार्याबद्दल मान्यवरांनी माहिती दिली. येत्या दीड महिन्यात सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असून येत्या १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनी या स्तंभाच्या लोकार्पण करण्यात आहे.