
रावेर (प्रतिनिधी) : लोकमत कॅम्पस क्लब व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २७ जुलै रोजी पार पडली. या स्पर्धेत मॅक्रो व्हिजन अकॅडमी रावेर येथील आयुष चंद्रकांत पाटील (इयत्ता आठवी) व कल्पेश जितेंद्र पाटील (इयत्ता सातवी) या विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
जिल्ह्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील अनेकांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी उत्कृष्ट लढत लढली. तुमचा सहभाग हीच तुमच्या आत्मविश्वासाची व कष्टाची खूण आहे, अशा शब्दांनी शाळेच्या संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. स्पर्धा जिंकणे हे सर्वस्व नसून, त्यात सहभागी होणे हेच यशाचे पहिले पाऊल आहे, अशा शब्दात सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील यांनी कौतुक केले.
शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी, व्यवस्थापक किरण दुबे, शाळेचे मुख्याध्यापक जे .डी. सर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनीही सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थी हा आमच्यासाठी विजेता आहे’. हे शाळेचे धोरण नेहमीच विद्यार्थ्यांना एक वेगळं प्रोत्साहन देत असते. सक्रिय सहभागी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.