
देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणला
रावेर (प्रतिनिधी) : येथील मॅक्रो व्हिजन स्कूलमध्ये २६ रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त, विद्यार्थ्यांनी वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, मनोहर बढे, CRPF मधील हर्षल महाजन यांनी उपस्थिती होती. यावेळी अमर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात, विद्यार्थ्यांनी एक आकर्षक संचलन (परेड) सादर केले. ज्यामध्ये त्यांची शिस्त आणि देशभक्ती दिसून आली. यानंतर काही विद्यार्थ्यांनी कविता,गायन, नृत्य आणि लाठीकाठी या कार्यक्रमांमधून आपले कौशल्य सादर केले.
विविध स्पर्धांचे आयोजन
तसेच क्रीडास्पर्धां उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. शाळेच्या प्रांगणात कारगिल विजय दिवस यावर आधारित चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला दिसत होता. या उपक्रमांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक करून शाळेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर भाषण दिले. तर शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर भाषण देऊन त्यांचे अभिनंदन केले.
गुणवंतांचा झाला सत्कार
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली आणि त्यांना खेळासाठी प्रोत्साहन मिळाले यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, अशा भावना शाळेचे मुख्याध्यापक जे.डी. सर यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन ठरले. विद्यार्थ्यांसोबतच वनिता पाटील यांनी शपथविधीमध्ये सहभाग नोंदवला. तसेच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला. यामध्ये नीट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणारी अनुष्का पाटील हिला सत्कार चिन्ह व अभिनंदन पत्र प्रदान करण्यात येऊन तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हास्तरीय चेस स्पर्धेमध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे, शिक्षक राहुल इंगळे, सना अन्सारी, सुरज भालेराव आदींनी सहकार्य केले. तसेच सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी, यांनीही विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले. सूत्रसंचालन हार्दिक मालखेडे, गायत्री पाटील, शाजीया पठाण, समर्थ पाटील व श्रुती इंगळे या विद्यार्थांनी केले.