
रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर येथे २६ जुलै शनिवार रोजी ‘आनंददायी’ उपक्रम शनिवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका हिरकणी धांडे यांच्या हस्ते माता सरस्वती, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात ‘कलर डे’ व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांसह खेळ समीर तडवी व मीनाक्षी या शिक्षकांनीही सहभाग नोंदवला. नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गानुसार गुलाबी, निळा, लाल, पिवळा हिरवा, नारंगी अशा सप्त रंगांच्या आकर्षक वस्तू व वेश परिधान केले. तर इयत्ता पाचवीच्या वेद शिंदेने आपल्या जीवनातील रंगांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका यांच्या संकल्पनेतून साकार झाला. सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक प्रवीण चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.