
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
ऐनपूर, ता. रावेर (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत २२ जुलै रोजी एक भव्य कृषी मेळावा झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन ऐनपूरचे सरपंच अमोल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत वाळके यांनी केळी उत्पादन तंत्रज्ञान व भाजीपाला व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. शैलेश तायडे व उपप्राचार्य प्रा. प्रवीण देवरे उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा ‘कृषिक अॅप’ सादर केला. ज्यामध्ये शेतीविषयक आवश्यक माहिती व कृषी दैनंदिनी उपलब्ध करून देण्यात आली. याची सविस्तर माहिती कृषीदूत सौरव महेर यांनी दिली.
या मेळाव्यात ऐनपूरसह तांदलवाडी, बामनोद, विरावली, नायगाव, थोरगव्हाण व केऱ्हाळे येथील शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुत्रसंचालन कृषीदूत पुष्पराज शेळके व कुणाल सपकाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गौरव महालकर व पियूष नेहते यांनी केले. यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. बी.एम. गोणशेटवाड व कार्यक्रम अधिकारी प्रा. वी.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.