
लोकमान्य टिळक जयंती निमित्त उपक्रम, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : स्वामी प्रि-प्रायमरी आणि समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा २३ रोजी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त कविता पठण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी मार्गदर्शन करीत टिळकांच्या “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या घोषवाक्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेत देशभक्तीपर सुंदर कविता सादर केल्या.
या कार्यक्रमात ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धक शिक्षकांमधून ज्योती पवार, वर्षा महाजन, आकांक्षा महल्ले या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्गातील पहिले तीन नंबर काढले. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.