
शिरसोली (वार्ताहर) : येथील हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली (प्र.बो.) येथे सोमवार दि. ३० जून रोजी सकाळी १० वा. पालक-शिक्षक सभेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बळीराम झुरकाळे, शिवाजी रामदास बारी आणि योगिता भागवत अस्वार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालक व शिक्षक प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी यावेळी पालकांना मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व, शाळेतील विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीची आवश्यकता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध लाभाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता कशी वाढवावी, याबद्दलही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता बडगुजर यांनी केले, तर कामिनी संजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेला बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.