जळगावआरोग्यताज्या बातम्यासमस्या

वेतनत्रुटी, कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचे घोषणा देऊन आंदोलन

जळगाव ‘जीएमसी’मध्ये १९ जण संपावर, उर्वरित ३०० जणांचे आजपासून कोणत्याही क्षणी बेमुदत कामबंद

जळगाव (प्रतिनिधी) : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दि. १७ रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सर्व परिचर्या संवर्गातील स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन घोषणा देत आंदोलन केले. आज १९ जुन्या परिचारिकांनी एकदिवसीय कामबंद केले. तर शुक्रवारपासून इतर ३०० जणांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. तर या ३०० जणांनी कोणत्याही क्षणी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

दुपारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत शासनाकडे मागण्या पाठविल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच, संपावर न जाता रुग्णहित लक्षात घेऊन कामावर या असे आवाहन केले. सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (संलग्नित मुख्यालय लातूर) दि. १५ व १६ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे व निदर्शने केली. दि. १७ जुलैला एक दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन आज गुरुवारी करण्यात आले. तर याची अजूनही दखल न घेतल्यामुळे १८ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने दि. ६ जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यास राज्यभरातून कडाडून विरोध करण्यात आला आणि शासन निर्णय रद्द करण्यात आला. राज्यात वाढत्या लोकसंखेनूसार १०० टक्के पद निर्मिती करणे, १०० टक्के पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत असून याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने परिचारिका संवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. आता शुक्रवारी आजचे १९ जण संपावरच राहणार असून इतर ३०० कर्मचारी हे दि. १८ जुलैपासून कोणत्याही क्षणी बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासन मान्य) शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, चे अध्यक्ष रुपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी, खजिनदार अक्षय सपकाळे या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button