
‘अभ्यासाच्या सवयी’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
भुसावळ (प्रतिनिधी) : के. नारखेडे माध्यमिक विद्यालय, तापी नगर, यावल रोड येथे संवाद समाजाशी या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत अभ्यासाच्या सवयीवर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत डॉ. राहुल भोईटे, वरणगाव, डॉ. प्रीती पाटील, जळगाव, डॉ. सचिन देशपांडे जळगाव आणि डॉ. नितीन धांडे, जळगाव या तज्ज्ञांनी अभ्यासाच्या सवयी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या प्रवासात दिशादर्शक ठरणारे मार्गदर्शन करतांना महत्वाच्या टीप्स दिल्यात. १६० विद्यार्थ्यांनी विशेष प्रश्नावली भरून दिली, ज्याच्या सखोल विश्लेषणातून त्यांना त्यांच्या अभ्यासपद्धतीत सुधारणा करता येणार असून, हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात मोलाचा ठरणार आहे.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर वैयक्तिक शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, आणि आत्मविश्वास वाढवणार्या सवयींचीही जाणीव करून देण्यात आली. संवादाच्या ओघात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अतिशय मनोपूर्वक उत्तरे दिली गेली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकच वाढला. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक झोपे, शिक्षिका संगीता अडकमोल आदींचे सहकार्य लाभले.