
जळगाव, (प्रतिनिधी) : नुकताच नाशिक येथे रुजू झालेले शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक संजयकुमार राठोड यांचा केसूला फाऊंडेशन नाशिकच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी केसूला फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. दिनेश राठोड, तज्ज्ञ संचालक तथा नाशिक मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, सेवानिवृत्त पीएसआय मखराम राठोड, सचिव प्रा. मोतीलाल राठोड, दारणा शाळेचे मुख्याध्यापक कुनगर आदी उपस्थित होते.




