क्रीडाजळगाव

आंतरजिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी जिल्हा निवड चाचणी

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन शनिवार १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट मैदानावर विद्या इंग्लिश स्कूलच्या मागे आयोजित करण्यात आली आहे.

ज्या मुलांचा जन्म १.९.२००३ रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग खाली दिलेल्या लिंक https://forms.gle/th8fu9xk4wyfwRWr6 वर जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी ₹ १००/- भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल जन्म दाखला / आधार कार्ड सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन यांनी केली आहे अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा.

सहभागी सर्व खेळाडूंना आपला फॉर्म ऑनलाइन भरावे. ज्या खेळाडूंनी ऑनलाइन फॉर्म भरलेला नाही, त्यांना प्रवेश मिळणार नाही. ही निवड फक्त जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button