
ऐनपूर, ता.रावेर, (प्रतिनिधी) : येथे डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषीदूतांनी सरदार वल्लभभाई पटेल आर्ट्स व सायन्स ज्युनिअर व सीनिअर कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी चर्चासत्राचे आयोजन केले. यानिमित्ताने विद्यार्थी लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम व जनजागृती निर्माण करण्यात आली. कृषीदूत गौरव महालकर, सौरव महेर, पियूष नेहते, पुष्पराज शेळके यांच्या तर्फे जनजागृती घडविण्यात आली.
कार्यक्रमास सरदार वल्लभभाई आर्ट्स आणि सायन्स चे कॉलेज चे प्राचार्य डॉ.जे. बी.अंजने, उपप्राचार्य डॉ.एस.एन.वैष्णव व डॉ. डी.बी.पाटील व प्राध्यापकांनी तसेच कृषीदूतांनी विद्यार्थ्यांना लोकसंख्येचे वाढते प्रमाण, त्याचे परिणाम आणि त्यावर उपाय यावर मार्गदर्शनपर भाषणे दिली.
यानंतर गावात जनजागृतीसाठी सार्वजनिक ठिकाणी युवकांना प्रोत्साहन करण्यात आले. वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरण व नैसर्गिक संपत्तिचा होणारा ऱ्हास याबाबत माहिती देण्यात आली तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे सोयीसुविधामध्ये होणारे विभाजन, गरिबी, बेरोजगारी, कुटुंब नियोजन व वाढत्या लोकसंख्येमुळे येणारे आरोग्य सेवेतील अडथळे यांसारख्या महत्वाच्या समस्या मांडण्यात आल्या. ही जनजागृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, बी.एम.गोणशेटवाड आणि प्रा.वी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.