
नंदुरबार येथे बैठकीत समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा
नंदुरबार, (प्रतिनिधी) : येथील संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकार समाज शैक्षणिक ग्रुप नंदुरबार यांच्या वतीने 20 जुलै रोजी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करुन गुणगौरव कार्यक्रमासाठी आठ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
नंदुरबार शहरातील संत रोहिदास चौकातील सभागृहामध्ये संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकार शैक्षणिक ग्रुप नंदुरबारतर्फे गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यासंदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आनंदा चव्हाण, जितेंद्र अहिरे, रमेश मलखेडे, सुरेश चव्हाण, मोहन अहिरे, विजय अहिरे, मनोज समशेर, प्रकाश जाधव, हरिष अहिरे, योगेश अहिरे, किसन अहिरे, संतोष अहिरे, जीवन अहिरे, छोटू अहिरे, विजय तिजवीज, दिनेश अहिरे, संजय अहिरे, सुरेश अहिरे, गणेश अहिरे, अशोक अहिरे, प्रविण अहिरे, दीपक अहिरे, धनराज अहिरे, राज अहिरे, रोहित अहिरे, कल्पेश कंढरे, शुभम अहिरे, भावेश अहिरे, प्रेम अहिरे, मनिष अहिरे, जगदीप अहिरे, आर्यन अहिरे, जितेंद्र अहिरे, सागर अहिरे आदी उपस्थित होते.
यावेळी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणावर भर देवून एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. जेणे करुन समाजातील तरुण पिढीला प्रेरणा मिळून शिक्षणाचे महत्त्व समजेल. यासाठी 20 जुलै रोजी नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालयात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
आठ समित्या स्थापन
या कार्यक्रमासाठी मुख्य आयोजन, नोंदणी, सन्मान, व्यवस्थापन, निमंत्रण, अन्नव्यवस्था, धनसंग्रह अश्या आठ समित्या स्थापन गठीत करण्यात आल्या. तसेच संत शिरोमणी रविदास महाराज ज्ञान गौरव पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले. आभार रमेश मलखेडे यांनी मानले.