लोककला महोत्सवात अनुभूती स्कूलचे कातकरी लोकनृत्य सर्वोत्कृष्ट

जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सलग्न संस्था बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई द्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा – २०२५ या लोककला महोत्सवात समूह कातकरी लोकनृत्य या प्रकारात विशेष नेपुण्यसह अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वोत्कृष्ट ठरली. संघाला ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांच्याहस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच एकल वादन प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी साहिल मोरे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. एकल लोकगीत प्रकारात मध्ये इयत्ता आठवीतील आराध्य खैरनार या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले, तसेच समूह लोकगीत या प्रकारामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या यशाबद्दल स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, विद्यार्थ्यांचे कौतूक केले. समूह लोकनृत्य मध्ये एकूण २५ संघ सहभागी होते. समूह लोकगीत मध्ये एकूण २० संघ होते. एकल वादन मध्ये एकूण ३५ विद्यार्थी तर एकल लोकगीत मध्ये एकूण २५विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यामध्ये अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, एकल वादन, एकल लोकगीत, एकल नृत्य अशा सर्व प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता. प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभूती स्कूलचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, संगीत शिक्षक भूषण खैरनार यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.




