डॉ. उल्हास पाटील मेेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये संविधान दिनानिमित्त भाषण स्पर्धा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील मेेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये आज दि २६ नोव्हे रोजी अप्पर सचिव उच्चशिक्षण मंत्रालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापिठाच्या आदेशानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला या निमित्त भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके, प्रशास क अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ. शुभांगी घुले-वाघ प्राध्यापक व विभागप्रमुख – शरीररचना शास्त्र, डॉ. कैलास वाघ मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख,डॉ. तुषार पाटील, डॉ. भवानी, डॉ. योगेश, डॉ. आलोक, डॉ. राशिका,डॉ. मो.अब्दुल्ला, डॉ.आयुष,इ मान्यवर उपस्थीत होते. मार्गदर्शन करतांना डॉ. शुभांगी आणि डॉ. कैलास वाघ यांनी संविधानाबददल माहिती देत स्पर्धेचा उददेश स्पष्ट केला.ऐश्वर्या शेट व चिन्मया वाझे व इतर विदयार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिक कर्तव्ये यावर मनोगत व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त आयोजित ही भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविण्यासोबतच वक्तृत्वकौशल्य विकसित करण्यास मोठी प्रेरणा ठरली.




