
जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे गरीब व गरजू महिलांना सक्षमीकरणा साठी तीन महिन्यांचे शिवणकाम प्रशिक्षण मोफत कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे सेक्रेटरी वर्धमान भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यशाळा ही स्वातंत्र्य चौकातील सुई धागा अकॅडमी येथे होत आहे.
यावेळी सुई धागा अकॅडमीच्या संचालिका आणि प्रशिक्षक माधुरी थोरात यांनी प्रशिक्षण कार्यशाळेची माहिती दिली. याप्रसंगी रोटरी स्टार्सचे संस्थापक अध्यक्ष सागर मुंदडा, हितेश सुराणा, दिलीप रंगलानी, राहुल कुकरेजा , सरिता झंवर, रूपा पोरवाल, हर्षल राजपूत यांची उपस्थिती होती.




