
रावेर, (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे गुरुपौर्णिमा मोठ्या साजरी करण्यात आली. प्रारंभी गुरुवर्य स्व.राजारामजी पवार आणि अध्यात्मिक गुरु स्व. चैतन्यजी बापू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रवींद्र पवार हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील गुरु म्हणजेच आई – वडील, निसर्ग आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर आधारित एक प्रात्यक्षिक दाखवले. तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जीवनातील गुरुचे महत्व पटवून दिले.
प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक राजू पवार, पर्यवेक्षिका कीर्ती कानुगो हे उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.