तीन बेपत्ता अल्पवयीन मुलींची भडगाव पोलिसांनी केली सुखरुप सुटका!

राजस्थान राज्यातील अलवर जिह्यातून मुलामुलींना घेतले ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील एका गावातील एकाच घरातील बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींना भडगाव पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. तांत्रिक सहायाच्या मदतीने राजस्थान राज्यातील अलवर जिह्यातून मुलामुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२० ऑक्टोबर २०२५ रोजी भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका गावातून व एकाच कुटुंबातून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने गावात व आजुबाजुच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याबाबत तात्काळ तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्याअनुषंगाने बेपत्ता मुली यांचे सर्वांचे मित्र/मैत्रीनी, नातेवाईक इत्यादींकडे कसुन चौकशी केली असता चौकशीमध्ये जवळपासच्या परिसरातील ३ तरुण मुले सुध्दा बेपत्ता झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. सर्व मुलामुलींचे मोबाईल सुद्दा बंद होते तरी तपासाचे गांभीर्य लक्षात घेता २ वेगवेगळे पथक तयार करुन १ पथक जळगाव तसेच १ पथक चाळीसगाव साईडला रवाना केले.
जळगाव येथील पथकाला रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत मुले व बेपत्ता मुली दि.२०/१०/२०२५ रोजीचे रात्रीचे १.२२ वा. दरम्यान रेल्वे स्टेशनच्या टिकीट घराच्या दिसुन आले. त्या कालावधीत झेलम एक्सप्रेसने ते गेल्याचे समजले संशयीत ३ बेपत्ता मुलामुलींचे नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावुन त्यांचे ज्या ठिकाणी नातेवाईक राहतात त्यांचे नाव व मोबाईल नंबर हस्तगत करुन त्यानुसार पुढील तपास सुर केला.
गुन्हयाच्या बाबतीत कुठलाही सुगावा नसतांना तांत्रिक बाबींची योग्यरित्या मदत घेवुन संशयीतांच्या नातेवाईकांकडे कसुन चौकशी करुन नमुद गुन्ह्यांत आरोपी रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, अजय सुकलाल देवडे, अमोल इश्वर सोनवणे यांना राजस्थान राज्यातील अलवर जिह्यातुन आणले. तिनही अल्पवयीन मुलींची सुखरुप सुटका केली.
यांनी केली कारवाई
गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक डॉ. मेहश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती नेरकर चाळीसगाव विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, पोहेकाँ पांडुरंग पाटील, पोना/मनोहर पाटील, पोकाँ/महेंद्र चव्हाण, पोकौं/प्रविण परदेशी, पोकौं/मिलींद जाधव, मपोकाँ सोनि सपकाळे इत्यादींनी गुन्हयाचा योग्य रित्या तपास लावला. तसेच पालकांनी आपल्या मुला/मुर्लीन कडे लक्ष ठेवावे असे जळगाव पोलीसांना आवाहन केले आहे.




