आरोग्यक्राईमजळगावताज्या बातम्याशासकीयसमस्या

कांचननगर गोळीबार प्रकरणातील फरार डोया व करण अटकेत

दोघांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

जळगाव (प्रतिनिधी) : कांचननगर गोळीबार प्रकरणात फरार असलेले दोन संशयित अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. डी मार्ट परिसरातून मध्यरात्री झालेल्या कारवाईत पोलिसांनी आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (२५, रा. कांचननगर) आणि करण पाटील (२५, रा. कुसुंबा) या दोघांना पकडले असून, न्यायालयाने त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात टोळीतील वर्चस्वासोबतच कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून लाडू गँगच्या सदस्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. त्या वादाचा शेवट थरारक गोळीबारात झाला. हद्दपार असलेला आकाश सपकाळे याने गोळीबार करत लाडू गँगमधील सदस्य आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर याच्या छातीवर गोळी झाडली, तर गणेश उर्फ काल्या सोनवणे यांच्या हाताला गोळी लागली होती. या गोळीबारात आकाश बाविस्करचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सपकाळे, सोनवणे, विक्की चौधरी, सागर पाटील, तुषार उर्फ साबू सोनवणे व करण पाटील या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोळीबारानंतर मुख्य आरोपी आकाश उर्फ डोया सपकाळे व करण पाटील हे दोघे फरार झाले होते. शनिपेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी मार्ट परिसरातून दोघांना पकडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button