जळगावात ६ व ७ डिसेंबर रोजी विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक सर्जरी शिबिर

रोटरी जळगाव इलाईट व गोल्डसिटी हॉस्पिटलचा उपक्रम; नोंदणी करणे आवश्यक
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोल्डसिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने आणि सुप्रीम इंडस्ट्रीजच्या सहकार्याने पिंप्राळा रोडवरील यश प्लाझा मधील गोल्डसिटी हॉस्पिटल येथे ६ व ७ डिसेंबर रोजी विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जळालेले व्यंग, भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्मतः असलेले हाताचे – पायाचे व शरीरावरील व्यंग, जुळलेली वाकडी, कमी व जास्त बोटे, मास व चेहऱ्यावरील वालदे व्रण, गरज नसलेले मोठे किंवा विचित्र व्रण, अपघाताने आलेली विकृती व व्यंग यावर विनामूल्य प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुणे येथील डॉ. पंकज जिंदाल, डॉ. श्रेया गवारे आणि मुंबई येथील डॉ. शंकर सुब्रमण्यम हे या शिबिरात तपासणी, उपचार, सर्जरी आणि मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी करणे गरजेचे असून त्यासाठी डॉ. गोविंद मंत्री, गोल्डसिटी हॉस्पिटल. डॉ.अशोक पाध्ये, डेंटल क्लिनिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पाचोरा. शशी बियाणी, ५७, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव. लक्ष्मीकांत मणियार, श्री एजन्सीज, अजिंठा रोड, जळगाव. डॉ. वैजयंती पाध्ये, डेंटल क्लिनिक, भास्कर मार्केट समोर, जळगाव यापैकी कोणत्याही एका ठिकाणी नाव नोंदणी करावी व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष संदीप झंवर, मानद सचिव हरगोविंद मणियार व प्रकल्प प्रमुख डॉ. वैजयंती पाध्ये यांनी केले आहे.




