
पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : गुरूकडून साधकांना मिळालेली दिक्षा व मंत्र याने मन मजबूत होते आणि हेच संकटाच्यावेळी आपले रक्षण करते. म्हणून अध्यात्मचे मूळ सार हे गुरुदीक्षित मंत्र आहे. असे परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धाम पाल येथे पूज्य बापूजीच्या संकल्पनेने आणि विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाने दर महा सुरु असलेल्या पौर्णिमा सत्संग महोत्सवात ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या आणि श्री गुरुनानक देव जी जयंती निमित्ताने संत श्री दिव्य चैतन्य जी महाराज यांनी सत्संगातून चैतन्य साधकांना संबोधित केले.
पुढे महाराज जी यांनी “नानक नाम जहाज है, चढे सो उतरे पार “या गुरुनानक देव जींच्या उपदेशातून या संसार रुपी अथांग भवसागरातून जर पार व्हायचे असेल तर या कलयुगात हरी नाम रुपी जहाज आणि सदगुरु चे सानिध्यात राहवे लागणार असून या नश्वर शारीरिक अवयव जसे हाता चे शृंगार हे जप माळ, जिभेने हरीनाम, कानाने हरी कथा श्रवण, पायाने तीर्थदर्शन, डोळ्यातून देवदर्शन आणि शरीराने सदगुरु च्या शरणी असल्याने जीवनाचा उद्धार होते. शेवटी महाआरती होऊन चैतन्य साधक परिवार लोहारा आणि कुसुम्बा समिती तर्फे महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.




