आरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्याधार्मिकनिवडपुरस्कारमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीय
जळगाव जिल्ह्यात ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ उपक्रमाला सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे जळगाव जिल्ह्यात ‘अमृत दुर्गोत्सव २०२5 हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा सोसायटीत युनेस्कोने घोषित केलेल्या १२ शिवकालीन दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती तयार करून त्या प्रतिकृतीसोबतचा सेल्फी किंवा छायाचित्र www.durgutsav.com या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे.
ही स्पर्धा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंस्कृतीचा गौरव आणि अभिमान जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा उपक्रम आहे. सहभागी व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीसह अभिनंदनपत्र ऑनलाईन प्राप्त होणार असल्याची माहिती अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी दिली आहे.




