डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची जुनागढ येथे सेवा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय रुग्णालयातील डॉक्टर मंडळींना भवनाथ तलेठी जुनागड येथे गिरणार परिक्रमा करणाऱ्या दत्त भक्तांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.
जळगाव येथील डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे बालरोग विभाग प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे आणि ह.भ. प.जगन्नाथ महाराज नेत्र विभागाचे डॉ. नितु पाटील, सोबत रेल्वे बाह्य रुग्ण विभाग भुसावळ चे फार्मासिस्ट विवेक पाटील आणि सहकारी दीपक फेगडे हे जुनागड ला गिरणार परिक्रमासाठी गेले होते. पण सततच्या पावसामुळे गीरणार परिक्रमा ही रद्द झाली. त्यामुळे जवळपास 24 तास रिकामा वेळ असल्याने तो वेळ सत्कारणी लावावा या उद्देशाने डॉक्टर मंडळींनी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भवनाथ तलेठी, नाकोडा येथे संपूर्ण दिवसभर येणाऱ्या सर्व दत्त भक्तांचे तपासणी करत औषध उपचार दिले.
यावेळी महाराष्ट्रातील जे जे काही रुग्ण या ठिकाणी आले त्यांना आपलेच डॉक्टर उपचार करत आहेत ही भावना सुखद करणार होती,कारण भाषेचा विषय नव्हता,तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. यावेळी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जयदीप वाला,डॉ. हार्दिक पटेल, फार्मासिस्ट मयूर सिसोदिया, सहकारी बिपिन ढाकेचा यांची मदत लाभली.
परिक्रमा न झाल्याची खंत पण रुग्णसेवेचा आनंद..!
आमची पहिलीच गिरनार परिक्रमा होती,गुरू शिखर दर्शन झाले पण पावसामुळे परिक्रमा रद्द झाली याची खंत होती ,पण भगवान दत्तभक्तांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. हीच आमची “रुग्णसेवा परिक्रमा”भगवान दत्त महाराज चरणी अर्पण
- डॉ. नितु पाटील, नेत्र तज्ञ,गोदावरी फौंडेशन, जळगाव




