आरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्यापर्यावरणमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीय

प्रगतीकडे जाणाऱ्या जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शन : खा. स्मिताताई वाघ

प्रदर्शनाच्या शुभारंभ दिनी पाच हजार जनांची भेट: डायनासोरचे अंडे, शत्रुला धड़की भरविणाऱ्या देशी बॉम्बच्या प्रतिकृती पाहुन भारावले जळगावकर

जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या तीस वर्षा पासून रखडलेले पाड़ळसरे धरणाचा प्रश्न मार्गी लावत ८५९ कोटिंची तरतूद करून आणली. अलीकडे नव्या इमारतीने रूपडे बदलनारे जळगाव विमानतळ महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकावर असून आता त्याला कार्गो करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रगतिशील महाराष्ट्र 2025 हे त्या विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून केंद्र सरकारपर्यन्त जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना केंद्रीय खात्यांच्या योजना कळाव्यात म्हणूनच हे प्रदर्शन आयोजित केल्याचे खा. स्मिताताई वाघ यांनी सोमवारी सांगितले.

दिल्ली येथील फ्रेंड्ज़ एक्झिबिशन एंड प्रमोशनच्या वतीने येथील शिवतीर्थ – जी एस ग्राउंडवर आयोजित केलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्या उद्धघाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुरेश भोळे, गोदावरी फाउंडेसनच्या सचिव केतकी पाटील, रायसोनी कोलेजच्या डायरेक्टर डॉ. प्रीती अग्रवाल, शासकीय अभियांत्रिकी कोलेजचे प्राचार्य सुहास गाजरे, पोदार इण्टरनेशनल स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन, ऑर्डन्स फॅक्टरी वरणगावचे चीफ जनरल मैनेजर एम. झेड. सरवर, फ्रेंड्ज़ एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, रीजनल हेड दत्ता थोरे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुवीर सोमवंशि, डीआरडिएचे प्रकल्प संचालक लोखंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

अतिशय थाटात सुरु झालेल्या या प्रदर्शनाचा शुभारंभ पोदार इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यानी पहाड़ी आवाजात गायिलेल्या महाराष्ट्र गीतांने झाली. उद्धघाटनानंतर बोलताना आ. राजू मामा उर्फ सुरेश भोळे म्हणाले की, खा. स्मिताताई वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कल्पकते तुन साकारलेले हे प्रदर्शन कृषि, शिक्षण, टेक्नोलॉजी, आरोग्य याच्या महितीने समृद्ध आहे. बांबूची भाजी असते हे मला पहिल्यांदाच कळाले. या वैविध्यपूर्ण प्रदर्शनाला सगळ्या जळगाव करानी भेट द्यावी असेही ते म्हणाले.

आज दिवसभर जळगाव शहरातील नागरिक, विविध शाळा महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यानी भेट दिली. पहिल्या दिवशी जवळपास साडेपाच हजाराहूंन अधिक लोकांनी भेट घेऊन माहिती घेतली.

एक लाख वर्षापूर्वीचे डायनोसरचे अंडे पाहुन विद्यार्थी भारावले

या प्रदर्शनात जीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या स्टॉलवर ठेवण्यात आलेले एक लाख वर्षापूर्वीचे डायनासोरचे अंडे पाहुन जलगावकर चांगलेच भारावले. विशेषता शाळकरी मुलानि मोठ्या कोतुकाने ते हात लाऊन पाहिले.

ऑर्डन्स फैक्टरी वरणगावच्या स्टॉलवर देशी बनावटीच्या बॉम्ब
या प्रदर्शनात वरणगावच्या ऑर्डिन्स फॅक्टरीच्या स्टॉल वर युद्धात वारण्यात येणाऱ्या बॉम्ब आणि बुलेटच्या प्रतिकृति मांडण्यात आल्या आहेत. त्या पाहुन प्रत्यक्षात युद्धभूमिची आठवण येणारे आहे.

प्रदर्शनात सहभागी झालेली ही विविध लक्षवेधक खाती
जैवतंत्रज्ञान विभाग (जैव प्रौद्योगिकी व संशोधन),केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद,कृषी विभाग, महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र राज्य वीज उत्पादन कंपनी लिमिटेड,केंद्रीय कुक्कुट विकास संस्था, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ,तमिळनाडू उद्यानविकास संस्था, भारतीय मानक ब्युरो, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड,केंद्रीय रेशीम मंडळ,भारतीय रिझर्व्ह बँक,ईशान्य क्षेत्रीय कृषी विपणन महामंडळ, ओडिशा बांबू विकास संस्था,भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR),केंद्रीय भांडारण महामंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय वनस्पती सर्वेक्षण,महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था,कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड,भारतीय सागरी विद्यापीठ, व्हाईट बँड असोसिएट्स,कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, महाराष्ट्र बांस (बांबू) विकास संस्था,भारतीय लघुउद्योग विकास बँक, भारतीय चहा मंडळ, न्यू इंडिया इन्शुरन्स, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड,केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, पंजाब नॅशनल बँक, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद,इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय भांडारण महामंडळ, मध्य रेल्वे, गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड,भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे स्टॉल लक्ष्यवेधक आहेत.

प्रास्ताविक प्रारंभी दत्ता थोरे यांनी केले. सरिता खाचने यांनी सूत्रसंचालन केले तर अखिला श्रीनिवासन यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी संतोष पवार, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी, साक्षी रावत, हिमांशी महावर, तानिक्षा सुक्ला, आकांक्षा झा, महालक्ष्मी आदिनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button