जलग्रामोत्सव श्रीराम रथोत्सवास भक्तीमय वातावरणात प्रारंभ!

जुने जळगावच्या श्रीराम मंदिर संस्थानची 152 वर्षांची अखंड पंरपरा कायम
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा (रामपेठ) 153 वर्षे परपंरा असलेला श्रीराम रथोत्सवाला आज सकाळी मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. कान्हदेशातील वारकरी सांप्रदायाचे सद्गुरु श्री. वै. अप्पा महाराज यांनी शके 1794 (सन 1872) मध्ये सुरु केलेला हा संस्थानचा सर्वोच्च मानबिंदू असलेला श्रीराम रथोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक आज जळगाव शहरात आलेले आहेत.
कार्तिक शु. प्रतिपदा अर्थात 23 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या वहनोत्सवास प्रारंभ झालेला असून आज 2 नोव्हेंबर या कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या पावन दिनी “श्रीराम रथोत्सव” संपन्न होत आहे. परंपरेप्रमाणे कार्तिक शु. प्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 5 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव संपन्न होईल.
या उत्सवात प्रतिदीनी रोज सकाळी पहाटे 5 वाजता काकडाभजन, काकडारती, सकाळी 7 वाजता मंगलारती, दुपारी 11.30 ते 12 माध्यान्ह पूजा, महानैवेद्य आरती. दुपारी 4 ते 5 सामुहीक हरिपाठ, संध्याकाळी 5 ते 6 नित्यनेमाचे चक्री भजन, संध्याकाळी 6 ते 6.30 संध्यापूजा, धुपारती. संध्याकाळी 7 वाजता श्रीराम मंदिरापासून वहन दिंडीस जलग्राम प्रदक्षिणेस प्रस्थान होईल.
विशेष कार्यक्रम : श्रीराम मंदिरात ग्रंथराज श्री यर्जुवद संहिता पारायण कार्तिश शुध्द अष्टमी नवमी 30 व 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 23, वक्ते वे. मु. श्री कैवल्य अजयशास्त्री दिक्षीत (शौचे) गुरुजी (श्रीक्षेत्र नाशिक, महाराष्ट्र)
- कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर रविवार संध्याकाळी 7 वाजता श्रीराम मंदिरात “श्रीराम अभंग गीत”, सादरकर्ते संस्कार भारती, जळगांव यांच्याकडून सादर करण्यात आले.
- प्रथम वहनपूजन : कार्तिक शु. प्रतिपदा बुधवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता या शुभदिनी वंशपरंपरेने प्रथम वहनपूजनविधी ह. भ. प. श्री. मंगेश महाराज जोशी (पंचम विद्यमान गादीपती) यांच्या शुभहस्ते झाली. याप्रसंगी जळगांव नगरीतील विविध क्षेत्रातील रामसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
- रथ पूजन : प्रबोधिनी एकादशी दि. 2 नोव्हेंबर सकाळी 9.30 वा. गुरुवार शुभदिनी वंशपरंपरेने प्रथम वहनपूजनविधी ह.भ.प. श्री. मंगेश महाराज जोशी (पंचम विदयमान गादीपती) यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. याप्रसंगी जळगांव नगरीतील विविध क्षेत्रातील रामसेवक व मान्यवरांच्या उपस्थित होते.
कार्तिकी प्रबोधिनी एकादशी या तिथी दिनी जळगांवचा श्रीराम रथ उत्सव हा भारतीतील एकमेव उत्सव असून प्रतिवर्षाप्रमाणे उत्सवाचे निमित्ताने मंदिरास रंगरंगोटी, विद्युत रोशणाई, केळीचे खांब, रंगीत रांगोळ्या काढले जातात, जळगांव नगरीत अबाल वृध्दांपासुन सगळ्यांना या उत्सावाचे विशेष आकर्षण असते.
जलग्राम दैवत श्रीराम मंदिरातील गर्भगृह स्थिळी प्रभु श्रीराम श्री क्षेत्र नाशिक पंचवटी येथे भ्रमण करीत असता ज्या शिळेवर (दगडावर) काही क्षण, काळी काळ बसले ते हे पवित्र स्थळा असुन असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या चैतन्यमय रामरायांचे अनेक भक्तांना विविध अनुभूति आल्यात व येत असतात.
श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभु श्रीरामांच्या भव्य मंदिर निर्माण कार्याचे जनआंदोलन प्रारंभीपासुन विविध उपक्रमाची सुरवात जळगांवचे विश्वहिंदु परिषदेने केली आहे. श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामजानुज साप्रदयातील श्री रामानुज या सिध्द सत्पुरुष महात्म्याकडून श्री सदगुरु अप्पा महाराजांना प्रभु रामरायांची चैतन्यमय पंचायतन मुर्ती प्रसाद म्हणुन भेट दिली. ही उत्सवमूर्ती वहन व रथावर विराजीत होत असते.
सर्वोच्च अशा या श्रीराम महोत्सवात सर्वांनी मनपूर्वक सहभागी होवून वहनोत्सव व रथोत्सव सोहळ्यानिमित्त प्रभु श्रीराम चैतन्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानचे वहीवाटदार, प्रमुख विश्वस्त, विद्यमान गादीपती ह. भ. प. श्री. मंगेश महाराज जोशी, विश्वस्त डॉ. भरत अमळकर, भालचंद्र पाटील, दुर्गादास नेवे, ॲड. सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, श्री नेवे तसेच रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, विलास चौधरी, सुजित पाटील, मुकूंद धर्माधिकारी गुरुजी, श्रीराम महाराज, नंदु शुक्ल गुरुजी, भानुदास चौधरी, कवि कासार, राजु काळे, अरुण मराठे, महेंद्र जोशी, विकास शुक्ल, विनायक जोशी, संजय पाटील, राजु कोळी आदींनी केले आहे.




