कलाकारजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्य
पद्मश्री चैत्राम पवार यांची शुक्रवारी प्रकट मुलाखत

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यामाने जमिनीवरचा माणूस असलेल्या पद्मश्री चैत्राम पवार यांची शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे बदलाचं बीज – बारीपाड्यापासून भारतापर्यंत या विषयावर होणारी ही प्रकट मुलाखत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन रोटरी जळगावचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर आणि रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष जितेंद्र बरडे, मानद सचिव ॲड. केतन ढाके यांनी केले आहे.




