चैतन्य साधक परिवारातर्फे माँ नर्मदा परिक्रमा पायी सुरू

पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : परमपूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या आशीर्वादाने, अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात श्री विशूधानंद जी, श्री हरिशरणानंद जी, श्री सर्व चैतन्य, श्री शुभ चैतन्य, श्री राम महाराजासह शेकडो चैतन्य साधक परिवारासहित श्री ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) येथून दी २५ ऑक्टोबरपासून माता नर्मदा पायी परिक्रमा सुरू करण्यात आली.
हा प्रवास अंदाजे दोन ते अडीच हजार किलोमीटरचा आहे आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांमधून ही पायी परिक्रमा पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिने कालावधी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या माता नर्मदा पायी परिक्रमाचा उद्देश सार्वजनिक कल्याण आणि शांती वाढवणे आहे.
या पायी यात्रेला निरोप देण्यासाठी फैजपूरचे सतपंथ महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज, झिरण्या येथील स्वामी राघवानंद महाराज, जामनेर येथील श्री श्याम चैतन्य महाराज, श्री दिव्य चैतन्य महाराज, श्री राधे चैतन्य महाराज, श्री ऋषीं चैतन्य महाराज सहित आश्रमांमधील समर्पित ब्रह्मचारी, संत आणि हजारो चैतन्य साधक परिवारासाह २५ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे हजर होऊन पूज्य महाराज जींची संकल्प पूर्णाहुती पूर्ण केल्यानंतर, हरिनाम संकीर्तनासह किमान पाच ते दहा किमी पायी प्रवास केला.




