
उत्राण, ता.एरंडोल (प्रतिनिधी) : उत्राण ता.एरंडोल येथील माजी सरपंच राजेंद्र भागवत पाटील यांची एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चिमणराव पाटील व विद्यमान आमदार अमोल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना एरंडोल तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती ही पारोळा येथील शिवसेना मेळाव्यात करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष न्यानेश्वर आमले, माजी पंचायत समिती सभापती अनिल महाजन, युवासेना तालुका प्रमुख कमलेश पाटील व आदी मान्यवर उपस्थितीत होते. राजेंद्र पाटील यांची शिवसेना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उत्राण येथे माजी सरपंच विनोद महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन, विकास सोसायटी संचालक विलास महाजन, गणेश कुलकर्णी, शरद महाजन, सोनू महाजन, मयूर महाजन व आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




