भारत सरकार आयोजित ‘आपला पैसा आपला अधिकार’ योजनेचा शुभारंभ!

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथे भारत सरकार आयोजित आपला पैसा आपला अधिकार या कार्यक्रमाचा शुक्रवारी शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
आपला पैसा आपला अधिकार” ही भारत सरकारची एक राष्ट्रव्यापी जागरूकता योजना आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना त्यांचे न-हक्क असलेले पैसे परत मिळवून देणे आहे. या कार्यक्रमांतर्गत, लोकांना त्यांची बँक खाती, विमा, लाभांश आणि शेअर बाजारातील न-हक्क असलेल्या मालमत्तेबद्दल माहिती दिली जाते आणि ते परत मिळवण्यासाठी मदत केली जाते. आपला पैसा आपला अधिकार हा कार्यक्रम भारतीय वित्तीय सेवा विभाग आणि जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँका आणि विमा कंपन्यांच्या मदतीने याची अंमलबजावणी केली जात आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रवीणकुमार सिंग, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अमर गजभिये, आरबीआयचे निशांत यादव, बँक ऑफ बडोदाचे सुरेश खैरनार, एलआयसीचे जितेंद्र बारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर सागर खेडकर, LDM चे मॅनेजर अनुराग मिश्रा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



