दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना ‘रोटरी वेस्ट’कडून फराळासह किराणा साहित्य वाटप!

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने शिरसोली रोड वरील एकलव्य नगर व पाळधी जवळील सावदे प्र.चा.या दोन ठिकाणी वंचित व आदिवासी बांधवांना दिवाळी फराळासह केवळ दिवाळीचे चार दिवस नाही तर किमान ४० दिवस पुरेल इतके किराणा साहित्य देऊन त्यांची सुखाची दिवाळी केली.
रोटरी वेस्टचे सदस्य दीपक सोनी यांनी त्यांच्याकडून देण्यात आलेल्या या किराणा किट मध्ये पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो मीठ, २५० ग्रॅम चहा पावडर, ५० ग्रॅम हळद, ५०ग्रॅम तिखट, अर्धा किलो चिवडा, अर्धा किलो बदाम हलवा यांचा समावेश होता.
दिव्यांग बांधवांसाठी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात किराणा साहित्य व फराळाचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी, प्रकल्प प्रमुख मुनिरा तरवारी, भद्रेश शाह, योगेश राका, सचिन वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.




