अभिवादनआर्थिककलाकारजळगावताज्या बातम्यापारोळामहाराष्ट्रशैक्षणिक

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या ‘वसंत बहार’ वार्षिक नियतकालिकचे प्रकाशन

संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती

पारोळा (प्रतिनिधी) : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिक ‘वसंत बहार’ चे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे, संध्या मोरे, संचालिका तनुजा मोरे, प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी संपादक डॉ.डि.एच.राठोड , कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य डॉ.व्हि.एस.पाटील, प्रा.पी‌.पी.पाटील , सहसंपादक प्रा.एस.सी.पाटील, डॉ.एस.बी.सावंत तसेच डॉ.ए.एस.महाले, डॉ.एस.एन‌.पाटील, डॉ.सी.आर.पाटील, प्रा.ए.ए‌.मोरे, डॉ.आय.एस.पाटील, प्रा.पी.एस.कोळी उपस्थित होते.

मुखपृष्ठाची संकल्पना प्राचार्य व प्रकाशक डॉ.व्हि.आर‌.पाटील यांनी सुचविली असून ‘बेटी बचाव – बेटी पढाव’ या संकल्पनेवर आधारित आहे. मुखपृष्ठ मानसी अंभोरे या विद्यार्थिनीने साकारले आहे. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना नियतकालिकेत विविध विषयांवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये लेख, निबंध, कविता, चारोळ्या लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते व त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळत असून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होत असल्याबद्दल संपादक मंडळाचे कौतुक केले. भविष्यात देखील विद्यार्थ्यांना साहित्य लिखाणासाठी प्रेरीत करण्याविषयी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांनी संपादक मंडळाचे व साहित्य लिहिणारे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नियतकालिक प्रकाशनासाठी संस्थेचे सचिव पराग मोरे, संचालक ॲड.रोहन मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button