जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रयोजनाराजकारणराष्ट्रीय-राज्यशासकीयशेतकरीशैक्षणिकसामाजिक
चाळीसगाव नगरपरिषद : १८ प्रभागांसाठी आरक्षण जाहिर

सर्वच प्रवर्गातील व्यक्तींना संमिश्र संधी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : येत्या नगरपरिषद निवडणुकीसाठी चाळीसगाव शहरातील प्रभाग आरक्षणाचा तक्ता जाहीर करण्यात आला आहे. एकूण १८ प्रभागांसाठी ‘अ’ आणि ‘ब’ या गटांनुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार काही प्रभाग सर्वसाधारण (जनरल), काही अनुसूचित जाती (एस.सी.) तसेच काही इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण असे
- प्रभाग क्र. १ ते ४ – जनरल पुरुषांसाठी तर त्यांचे जोड प्रभाग अनुक्रमे जनरल महिला, एस.सी. महिला, जनरल महिला व ओबीसी महिला
- प्रभाग ५ – एस.सी. पुरुष
- प्रभाग ६ – जनरल पुरुष असा क्रम असून, त्यांच्या जोड प्रभागात अनुक्रमे जनरल महिला व ओबीसी महिला
- प्रभाग ७, ८, १० आणि ११ – ओबीसी पुरुषांसाठी तर त्यांच्या जोड प्रभागात जनरल व ओबीसी महिला यांना आरक्षण
- प्रभाग ९ – एस.सी. पुरुष, तर जोड प्रभाग जनरल महिला यांच्यासाठी राखीव आहे.
- प्रभाग १२ ते १८ या गटात बहुसंख्य प्रभाग जनरल पुरुषांसाठी असून, जोड प्रभागात एस.सी. महिला, ओबीसी महिला आणि जनरल महिला आरक्षित करण्यात आले आहेत.
या आरक्षणामुळे शहरातील विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळणार असून, नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग येत आहे. राजकीय कार्यालयांमध्ये इच्छुकांची ऊठबस सुरू झाली आहे.




