
कंडारी येथील खुन प्रकारण; जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहत असलेल्या जितेंद्र राजेंद्र साळुंखे (रा. केसी पार्क जळगांव) या तरुणाचा किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. त्यातील तिघ संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ रोजी मयत नामे जितेंद्र राजेंद्र साळुंखे व संशयित आरोपी राजु ऊर्फ बाबु अशोक सपकाळे, (रा. क्रांती चौक, शिवाजी नगर, जळगांव), मयुर दिपक अलोने (रा. बारसे कॉलनी, शिवाजी नगर, जळगाव) हे दोघ दिपक वसंत शंकपाळ (रा. महादेव टेकडी, कंडारी ता. भुसावळ) याचे घरी जेवणाकरीता गेले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाल्याने संशयित आरोपी यांनी जितेंद्र यास घातक हत्याराने गंभीर दुखापत करुन जिवे ठार करुन फरार झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी फरार आरोपी यांना अटक करण्यासाठी पोउपनि सोपान गोरे यांचे नेतृत्वात पथक नियुक्त केले. त्यानुसार पोउपनि सोपान गोरे व पोह सलीम तडवी, पोअ रतनहरी गिते, पोअ सिध्देश्वर डापकर, पोअ मयुर निकम यांनी आरोपी राजु ऊर्फ बाबु अशोक सपकाळे व मयुर दिपक अलोने यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी भुसावळ शहर पो.स्टे. यांचे ताब्यात दिले आहे.
यांनी केली कारवाई
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सोपान गोरे व पोह सलीम तडवी, पोअ रतनहरी गिते, पोअ सिध्देश्वर डापकर, पोअ मयुर निकम यांनी केली आहे.




