
जिल्हा महानगर अंतर्गत विविध नियुक्त्या
जळगाव (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या मार्गदर्शनाखाली व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत आढावा अभियानाचे संयोजक मुकुंद मेटकर यांनी घेतला.
बैठकी दरम्यान भाजप जळगाव जिल्हा महानगर अंतर्गत मोर्चा/आघाडी/प्रकोष्ट/सेलच्या संयोजक पदी नियुक्त्या करण्यात आल्या. यात महिला मोर्चा अध्यक्ष नीतू परदेशी, भटक्या विमुक्त जाती संयोजक अनिल जोशी, सहकार आघाडी संयोजक निलेश झोपे, ज्येष्ठ नागरिक सेल संयोजक महेश कापुरे, पदवीधर प्रकोष्ट संयोजक शिरीषकुमार तायडे, आयुष्यमान भारत सेल योगेश निंबाळकर, अभियंता सेल नितीन परगावकर, NGO सेल पंकज जैन यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीपत्र देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भारतीताई सोनवणे, नितीन इंगळे, जयेश भावसार, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, प्रदेश पदाधिकारी संतोष इंगळे, मा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमाला काळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




