आंदोलनआरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसामाजिक
जि.प. शिक्षकांचे वेतन थकले; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) : वेतन थकल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. थकीत वेतन पाच दिवसांत न झाल्यास थेट आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोणतेही कारण नसताना त्यांचे वेतन थांबवून वेतन अधीक्षक रियाज तडवी मानसिक छळ करत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश नसतानाही तडवी हे उर्मटपणे ‘वेतन मिळणार नाही’ असे सांगतात. दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण तोंडावर असताना वेतनाअभावी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून आजपासून पाच दिवसांच्या आत थकीत वेतन अदा न झाल्यास, प्रशासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शांततापूर्ण आमरण उपोषण केले जाईल, असे निवेदन शिक्षकांनी दिले आहे..




