कौतुकास्पद; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जामनेरच्या पंचायत समितीचा पुढाकार

पावणेदोन लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द; अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी
जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पंचायत समिती, जामनेर येथील अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पुढाकार घेतला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, मिनल करनवाल यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली पंचायत समिती जामनेरच्या वतीने ₹ १,७५,१११/- (एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे अकरा रुपये) इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला.
या उदात्त कार्यामध्ये पंचायत समिती जामनेरच्या संपूर्ण टीमने दाखवलेली एकजूट, संवेदनशीलता व त्यागभावना विशेषतः कौतुकास्पद आहे. पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हा हातभार निश्चितच दिलासा देणारा ठरेल. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी पंचायत समिती जामनेरच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले असून या कार्यासाठी त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.




