भुसावळमध्ये कोंबींग ऑपरेशन राबवून दोघं फरार आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तीपणे भुसावळ येथील ईराणी वस्ती असलेल्या पापा नगर येथे अचानक कोंबींग ऑपरेशन राबवून अनेक गुन्हयांमध्ये फरार असलेल्या २ आरोपी यांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सणउत्सव काळात जिल्हयात घडणारे मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हयांचे अनुषंगाने ३० सप्टेंबर रोजी ही कार्यवाही करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव व पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ बाजारपेठ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव व भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीक रित्या ईराणी वस्ती असलेल्या पापानगर, भुसावळ येथे अचानक कोंबींग ऑपरेशन राबविले.
गंभीर गुन्हे दाखल असलेले दोघ अटकेत
कोंबींग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी तालीब अली रशीद अली (वय २० वर्ष रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ), मोहम्मद अली लियाकत अली (वय ३५ रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) हे घरी हजर मिळुन आल्याने त्यांची सखोली चौकशी केली. त्यावरून तालीब अली याच्यावर एमआयडीसी पो.स्टे. तसेच वरणगांव पो.स्टे. येथे मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांमध्ये फरार असल्याचे आढळून आले. तर मोहम्मद अली लियाकत अली हा वारला पो.स्टे. जिल्हा वडवाणी (मध्यप्रदेश) येथील फसवणुकीच्या गुन्हयात फरार होता. तसेच त्याच्यावर फसवणुक करणे तसेच जबरी चोरीचे मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हे दोन्हींवर मालमत्तेविरुध गुन्हे करण्याचे सवयीचे असुन ते गुन्हा केल्यानंतर बऱ्याच दिवसांपासुन फरार होते त्यांचा शोध घेवुनही ते पोलीसांना मिळुन येत नव्हते. आज रोजी त्यांना ताब्यात घेवुन संबंधीत पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहेत.
यांनी केली कारवाई
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन पाटील, भुसावळ बाजारपेठ, पोउपनि, सोपान गोरे, स्थागुशा जळगांव, पोउपनि राजु सांगळे भुसावळ बाजारपेठ, मपोउपनि. भारती काळे, भुसावळ बाजारपेठ, श्रेणी पोउपनि. रबी नरवाडे, स्थागुशा जळगांव तसेच स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव व भुसावळ बाजापेठ येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.




