
रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन स्कूल, रावेर येथे नवरात्री उत्सव निमित्त भव्य गरबा महोत्सव आनंदोत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा नृत्य व संगीताच्या तालावर रंगून गेली होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक व पारंपारिक गरब्याने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. सर्व विद्यार्थी रंगीबिरंगी वेशभूषेमध्ये सुंदर दिसत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए.पी.आय बोचरे सर कुटुंबासह उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. नवरात्रीच्या पारंपारिक विधी व दुर्गापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नृत्य शिक्षक रवी फुलमाळी व संगीत शिक्षक दिगंबर मुऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले.
शाळा नेहमीच संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यात एक एक पाऊल पुढे टाकत जात आहे. कार्यक्रमाची शोभा बघून शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, शाळेचे सचिव स्वप्नील पाटील यांनी नवरात्री उत्सवाच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि जॉईन सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पाचपोहे, खजिनदार विजय गोटीवाले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी, यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे, मुख्याध्यापक जनार्दन धनगर, सर्व शिक्षकवृंद पालकवर्ग व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या संचालिका वनिता पाटील मॅडम स्वतः उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचे ही काळजी घेण्यात आली होती. संपूर्ण वातावरण भक्तीभाव, उत्साह आणि सांस्कृतिक रंगांनी उजळून निघाले होते. मॅक्रो व्हिजन स्कूलचा हा गरबा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.




