जळगावात ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन स्पर्धेमधून नशा मुक्तीबाबत जनजागृती

भारतीय जनता युवा मोर्चाचा उपक्रम; हजारो युवांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तर्फे ‘नमो युवा रन’ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सेवा पंधरवड्यानिमित्त रविवार, २१ सप्टेंबर रोजी करण्यात आले. नशामुक्त भारत – आत्मनिर्भर भारत – युवा भारत या घोषवाक्याने सजलेल्या या धावण्यात हजारो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, क्रीडांगणासह सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
सकाळी ७ वाजता काव्यरत्नावली चौकातून या ‘रन’ला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने युवक आणि युवती, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमात केवळ तरुणच नव्हे, तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या भैरवी वाघ-पलांडे, उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे आणि रेखा वर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. निरोगी जीवनासाठी खेळाला प्रोत्साहन देण्यासोबतच, व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमामागील महत्त्वाचा विचार होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नशा मुक्तीच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, “आजची युवा पिढी देशाचे भविष्य आहे. त्यांना योग्य मार्गावर आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे तरुणांना योग्य दिशा मिळते आणि समाज सकारात्मक बदलांकडे वाटचाल करतो.” या ‘रन’मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने नशा मुक्तीचा संदेश आपल्या जीवनात रुजविण्याची शपथ घेतली.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजुमामा), भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ, प्रदेश सचिव भावेश कोठावदे, महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्यासह भाजप मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी ‘नमो युवा रन’ चे संयोजक रोहित सोनवणे तर सहसंयोजक हितेश राजपूत, आकाश मोरे, उन्मेष चौधरी, लकी चौधरी, रियाज शेख, सतनामसिंग बावरी, गजानन वंजारी, अश्विन सैंदाणे, कल्पेश सोनवणे, दिनेश पुरोहित, जितेंद्र चौथे, सुनील (बंटी) भारंबे, बंटी बारी, हर्षल सिखवाल, निलेश बाविस्कर, उज्वल पाटील, संकेत शिंदे, श्याम पाटील, स्वप्नील चौधरी, विक्की चौधरी, विक्की सोनार, अबोली पाटील, पंकज गांगडे, विपुल बराटे, हर्षल चौधरी सगळ्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र नाईक व ऍथलेटिक्स असोशियन सचिव राजेश जाधव, प्रो. इकबाल मिर्जा यांचे सहकार्य लाभले.




