स्वामी प्रि-प्रायमरी अँड समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी प्रि-प्रायमरी अँड समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा बु येथे बुधवारी आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. सर्व इयत्ता चौथी व UKG च्या विद्यार्थ्यांना धनुर्वात चे इंजेक्शन (डोस) देण्यात आले.
सकाळी १० वाजता लसीकरण कार्यक्रमास सुरुवात झाली. या लसीकरण कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. संकेत पाटील, परिचारिका सविता पंडीत यांच्यासाहत आशा वर्कर्स व इतर कर्मचारी उपस्थित होते.
लसीकरण दरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांनी दक्षता घेतली. तापसाठी योग्य ती औषधे देण्यात आले. विद्यार्थ्यांना अत्यंत शिस्तप्रिय लसीकरण यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या आरोग्य अधिक सक्षम होण्यास मदत होईल. शेवटी आभार मुख्याध्यापिका यांनी मानले.




