जळगावात जानेवारीमध्ये सुवर्णकार समाजाचा भव्य मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या बैठकीत ‘ऋणानुबंध’ वधु-वर-पालक परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी कार्यकारिणी जाहीर
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा जळगाव यांच्या वतीने ६ वा ‘ऋणानुबंध’ वधु-वर-पालक परिचय मेळावा, १० जानेवारी २०२६ रोजी आदित्य लॉन, संभाजी नगर हायवे, जळगाव रविवार रोजी येथे होणार आहे. त्या नियोजनासाठी जळगाव येथील सोनार समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वानुमते नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र बिरारी हे होते. यावेळी समाज बांधवांनी अनेक सूचना मांडल्या त्यांचे विचार करून पुढील नियोजन करू अशी ग्वाही महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा अध्यक्ष संजय विसपुते यांनी दिली. मेळावा नियोजन अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं व्हावा यासाठी मेळावा नियोजन समिती जाहीर करण्यात आली.
अशी आहे कार्यकारिणी
‘ऋणानुबंध २०२६’ वधु-वर-पालक परिचय मेळावा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – मेळावा स्वागत अध्यक्ष : रमेश वाघ, मेळावा प्रमुख सुभाष सोनार, मेळावा उप प्रमुख नितीन गंगापुरकर, मेळावा नियोजन समिती प्रमुख शरदचंद्र रणधीर, मेळावा सचिव प्रशांत विसपुते, मेळावा सह सचिव दिलीप पिंगळे, मेळावा प्रसिद्धी प्रमुख गोकुळ सोनार.
नवीन मेळावा समिती पदाधिकाऱ्यांना उपस्थित सर्व समाज बांधवांनी शुभेछा दिल्या. मेळाव्याचे नियोजन कामी संलग्न समित्याचे गठन लवकरच करण्यात येईल, अशी माहिती उपाध्यक्ष विजय वानखेडे यांनी दिली. जगदीश देवरे, डॉ. विजय बागूल यांनी मेळाव्यात जास्तीत जास्त नियोजित वधु -वरांनी नोंद करावी व मेळाव्यात मुलींनी उपस्थित राहावे, अशी सूचना मांडली. त्याबद्दल सर्वांनी काळजी घ्यावी, असे मत व्यक्त केले. प्रसंगी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते. आभार सचिव संजय पगार यांनी मानले.




