प्रा.अनिल एस.महाले यांना पी.एच.डी. पदवी

पारोळा (प्रतिनिधी) : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील भूगोल विभागातील प्रा. अनिल एस.महाले यांना ‘ पॅराडाईम शिफ्ट ॲन्ड रिसेन्ट ट्रेंड्स इन रुरल सेटलमेंट ऑफ धुळे डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र स्टेट जिऑग्रफिकल स्टडी’ याविषयावर राजस्थान विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती अर्थात पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.महाले यांनी म्हसदी महाविद्यालयातील मार्गदर्शक प्रा.डॉ.शिवाजी पाटील व राजस्थानचे सहमार्गदर्शक प्रा. डॉ.अलोककुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पुर्ण केले. जगदिश प्रसाद झाबलमल टिबरेवाला विद्यापीठ, झुनझूनू, राजस्थान या विद्यापीठात शोध प्रबंध सादर केला. बाह्यपरिक्षक म्हणून हरियाणा येथील प्रा.डॉ.प्रदिप शर्मा यांच्या समोर वरिलविषयावर मौखिक सादरीकरण केले. या संशोधन कार्यास राजस्थान विद्यापीठाकडून प्रा.अनिल महाले यांना पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.
या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे, सचिव पराग मोरे, प्रशासकीय अधिकारी आणि संचालक ॲड.रोहन मोरे, प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील, उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, उपप्राचार्य डॉ.जी.पी.बोरसे, उपप्राचार्य डॉ.ए.एम.पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.




