
स्वामी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा येथे शिक्षक दिनानिमित्त उपक्रम
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी प्रि-प्रायमरी अँड समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ सप्टेबंर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शिक्षक दिनानिमित्त आयोजित भाषण स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “शिक्षकांचे महत्व, आणि शिक्षक: समाजाचे आधारस्तंभ” या विषयावर प्रभावी व मार्मिक इंग्रजी भाषेत भाषणं दिली. सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच नंदिनी चौधरी व वैष्णवी पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
यांचा झाला सन्मान
स्पर्धेनंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. ग्रामपंचायत केऱ्हाळा येथील तलाठी रवि शिंगणे यांनी विद्यार्थ्यांनमधून तीन नंबर काढले व बक्षिस वितरण त्यांनी केले. स्पर्धेत प्रथम भार्गवी प्रदीप पाटील, दृटीय मोक्षदा निलेश पाटील व जिऑन जे.बन्नीचंन तर तृतीय क्रमांक शिवण्या मोहन पंडीत हिने पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. बक्षीस वितरण सोहळा आनंदमयी व प्रेरणादायी ठरला.




